आपण कॉम्पुटर वापरतो म्हणजे फाईल कुठे ना कुठे सेव्ह करुन ठेवतोच. मग फोल्डर तयार करणं आणि त्यात फाईल सेव्ह करणं हे आपल्याला नेहमीचं झालेलं असंत. पण कॉम्पुटर जेवढा सोपा तेवढा त्यातील धोकाही जास्त असतो. चुकून व्हायरस शिरला आणि नेमका आपल्या कामाचाच फ़ोल्डर डिलीट झाला तर मोठा पस्तावा येतो. पण आता पस्तावा करत बसायची काही गरज नाही. कारण आपण बनवू शकतो ’डिलिट न होणारा’ फोल्डर.
जर आपला कॉम्पुटर एकापेक्षा जास्त जण वापरत असतील, तर कधी कधी दुसऱ्याच्या चुकीनं किंवा नकळत आपला फोल्डर डिलीट होतो. ही नकळत झालेली चुक आपल्याला महागात पडू शकते. आपण विंडोजम्ध्ये चुकून डिलीट न होऊ शकणारे फोल्डर तयार करु शकतो. या मध्ये आपल्या मह्त्त्वाच्या फाईल ठेऊ सुरक्षित ठेऊ शकातो.
प्रोसेस:-->
* असा फोल्डर तयार करतांना तो श्क्यतो प्रोग्राम फाईल्स असलेल्या ड्राईव्हवर करावा.
* यानंतर कमांड प्रॉम्ट ओपन करावा. यासाठी ’रन’ मध्ये ’cmd’ टाईप करुन कमांड ओपन करता येतो.
* यामध्ये आता cals<folder name>e/c/d/%username% ही कमांड द्यावी. या कमांडमुळे आपण निवडलेला फोल्डर हा कुणीही डिलीट करु शकत नही.
* तसंच, आपल्या लॉग इन अकाऊंटशिवाय इतर अकाऊंटवरुन लॉग इन केलेल्यांना हा फोल्डर बघताही येणार नाही. जर हा कुणी बघायचा प्रयत्न केलाच, तर त्याला परवानगी नाकारण्याचा मेसेज दाखवला जाईल.
* आता जेव्हा आपल्यालाच हा फोल्डर पुन्हा वापरायचा झाल्यास पुन्हा मघाची कमांड टाईप कारुन त्याच्या शेवटी :f’ लवून एंटर करावं. यामुळे हा फोल्डर पुन्हा पुर्वीसारखा वापरता येऊ शकतो.
* याशिवाय, आणखी एका मार्गानेही आपण हे करु शाकतो. यासाठी मघासारखे कमांड प्रॉम्ट ओपन करायचं. त्यामध्ये आपल्याला ज्या जागेवर हा फोल्डर तयार करायचा आहे, त्याचा पाथ टाईप करायाचा.
* त्यानंतर तिथे md\Aux\ ही कमांड टाईप करायची, की झाला आपला फोल्डर तयार. हा फोल्डर डिलीट करण्यासाठी rd\Aux\ ही कमांड टाईप करायची.
एकदा करुन तर बघा!
बरेच छान माहिती तू दिलीस
ReplyDeleteआज बरेच शिकायला मिळाले तुझ्या कडून
धन्यवाद